एनआयए, रॉ, आयबीला हवेत आयपीएस अधिकारी, केंद्रात प्रतिनियुक्तीसाठी मिळणार संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 05:35 AM2018-01-29T05:35:29+5:302018-01-29T05:35:38+5:30
केंद्रीय गृहविभागाकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व आयबी, रॉ यासारख्या गुप्तचर यंत्रणांमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करण्यासाठी महाराष्टÑ पोलीस दलातील आयपीएस अधिकाºयांना आवाहन करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांबरोबरच केंद्राच्या विविध आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार असून, इच्छुक अधिकाºयांना १५ फेबु्रवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. इच्छुक अधिकाºयांचा कार्यकाळ आणि वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) पडताळून, त्यांच्या नावांची यादी केंद्रीय गृहविभागाकडे पाठविली जाईल, केंद्रीय आस्थापनातील रिक्त पदासाठी २०११ पर्यंतच्या, तर एनआयए, आयबीसाठी २०१३ पर्यंतच्या आयपीएस तुकडीतील अधिकाºयांची नियुक्ती केली जाईल, असे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले. केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागांतील सुमारे ४० टक्के पदे ही विविध राज्यांतील अधिकाºयांच्या प्रतिनियुक्तीने भरली जातात. त्यासाठी दरवर्षी ‘आॅफर लिस्ट’ जाहीर केली जाते.
- जमीर काझी
मुंबई : केंद्रीय गृहविभागाकडून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व आयबी, रॉ यासारख्या गुप्तचर यंत्रणांमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करण्यासाठी महाराष्टÑ पोलीस दलातील आयपीएस अधिकाºयांना आवाहन करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांबरोबरच केंद्राच्या विविध आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार असून, इच्छुक अधिकाºयांना १५ फेबु्रवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे.
इच्छुक अधिकाºयांचा कार्यकाळ आणि वार्षिक गोपनीय अहवाल (एसीआर) पडताळून, त्यांच्या नावांची यादी केंद्रीय गृहविभागाकडे पाठविली जाईल, केंद्रीय आस्थापनातील रिक्त पदासाठी २०११ पर्यंतच्या, तर एनआयए, आयबीसाठी २०१३ पर्यंतच्या आयपीएस तुकडीतील अधिकाºयांची नियुक्ती केली जाईल, असे गृहविभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले. केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागांतील सुमारे ४० टक्के पदे ही विविध राज्यांतील अधिकाºयांच्या प्रतिनियुक्तीने भरली जातात. त्यासाठी दरवर्षी ‘आॅफर लिस्ट’ जाहीर केली जाते.
अधिकारी किमान २ ते ३ वर्षे एका पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत राहू शकतात. आवश्यकतेनुसार किंंवा सरकारच्या इच्छेनुसार त्याच्या मुदतीमध्येही वाढ केली जाते. यंदा केंद्रीय आस्थापनांच्या रिक्त असलेल्या व येत्या काही महिन्यांत रिक्त
होणाºया पदावर, अपर अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाची निवड केली जाईल. त्यासाठी २०११च्या आयपीएस बॅचपर्यंतच्या अधिकाºयांचा विचार केला
जाणार आहे, तर एनआयए, आयबी व रॉ येथे प्रतिनियुक्तीसाठी २०१३च्या तुकडीचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी केंद्राने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार माहिती सादर करावयाची आहे.