एनआयएने नाेंदविले ४० हून अधिक जणांचे जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:06 AM2021-04-14T04:06:47+5:302021-04-14T04:06:47+5:30
स्फाेटक कार प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक कार व ठाण्याचे ...
स्फाेटक कार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक कार व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंत ४० जणांहून अधिक जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह हॉटेल मॅनेजर, नंबर प्लेट दुकान चालकाचा समावेश आहे, तर या प्रकरणात वाझेसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
एनआयए या प्रकरणाचा तपास आठ मार्चपासून करीत आहे. त्यामध्ये पहिले १० दिवस स्फोटक कार प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता. त्यामध्ये निलंबित एपीआय सचिन वाझे हाच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला १३ मार्चला अटक झाली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याचा मित्र व ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची त्याने हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो गुन्हाही एनआयएकडे वर्ग करण्यात आला. महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या महिनाभरात विविध अंगांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. त्यामध्ये आतापर्यंत संबंधित ४० जणांची कसून चौकशी करून जबाब घेतले आहेत.
आयुक्तालय, चारकामरान रोड, तसेच मुंबई, ठाणे येथील प्रमुख मार्ग, टोल नाके, वाझे राहत असलेल्या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. त्यातून अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत.
...................