Join us

हिरेन हत्या प्रकरणाचा तपास आज एनआयए ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:06 AM

एटीएसला गृहविभागाच्या आदेशाची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील राजकारण व पोलीस वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या अँटिलियाच्या स्फोटक ...

एटीएसला गृहविभागाच्या आदेशाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील राजकारण व पोलीस वर्तुळात खळबळ उडवून दिलेल्या अँटिलियाच्या स्फोटक कारबरोबरच ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्याचा केंद्रीय गृहविभागाने घेतला आहे. मात्र त्याबाबत राज्य सरकारकडून आदेश मिळाला नसल्याने या प्रकरणाचा तपास अद्यापही एटीएसकडे आहे. सोमवारी त्याबाबत आदेश जारी केले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा छडा लावण्यात एटीएसला यश आले आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार वादग्रस्त सचिन वाझे हाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या कटात सामील असलेल्या एका निलंबित कॉन्स्टेबलसह बुकीला अटक केली आहे. तपासासाठी वाझेचा एनआयएकडून ताबा मिळवण्यासाठी मागणी केली आहे. त्याच वेळी या प्रकरणाचा तपास एनआयकडे वर्ग करण्याचा निर्णय केंद्रीय गृहविभागाने घेतला आहे.

------------------------

हिरेनच्या वकिलाकडील चौकशीमुळे वाझेविरुद्ध पुराव्याला बळ

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याचे वकील के.एच. गिरवी यांच्याकडे एनआयएच्या पथकाने केलेल्या चौकशीतून वाझेविरुद्ध आरोपाला पूरक माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्धचे पुरावे भक्कम झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गिरवी यांच्याकडे शनिवारी सुमारे चार तास चौकशी केली. वाझे यानेच पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबाबत हिरेन यांना पत्र लिहून दिले होते, असे त्यांनी सांगितले असल्याचे समजते. वाझे याला ६ महिन्यांपासून ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

---------------