Join us

निफ्टीची नव्या विक्रमाला गवसणी; सेन्सेक्सही वधारला

By admin | Published: August 23, 2014 1:49 AM

देशांतर्गत शेअर बाजारात आजही तेजीचा कल कायम राहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 59 अंकांच्या तेजीसह 59,419.55 अंकावर बंद झाला.

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात आजही तेजीचा कल कायम राहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 59 अंकांच्या तेजीसह 59,419.55 अंकावर बंद झाला. तिकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 7,9क्क् अंकाची विक्रमी पातळी गाठली.
बाजारातील जाणकारांच्या मते, रिझव्र्ह बँकेचे वाढीवरील निवेदन आणि जागतिक बाजारातील मजबूत कल यामुळे संस्थात्मक व किरकोळ गुंतवणूक कायम राहिल्याने बाजारात तेजी आली. अमेरिकेच्या सकारात्मक आर्थिक आकडेवारीमुळे आयटी कंपन्यांचे शेअर वधारले. देशी आयटी कंपन्यांसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 22.1क् अंक वा क्.28 टक्क्याच्या उसळीने 7,913.2क् अंक या विक्रमी पातळीवर स्थिरावला. दिवसभरात तो 7,929.क्5 अंक या विक्रमी पातळीला स्पर्श केला. 2क् ऑगस्ट रोजी निफ्टी 7,922.7क् अंकार्पयत गेला होता.
3क् शेअर्सचा सेन्सेक्सही 59.44 अंक वा क्.23 टक्क्याच्या तेजीसह 26,419.55 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स काल 45.82 अंकांनी बळकट झाला होता. बाजारातील तेजीने सेन्सेक्स व निफ्टी या आठवडय़ात 1.5 टक्क्याहून अधिकने बळकट झाले. सलग दुस:या आठवडय़ात बाजारात तेजी नोंदली गेली. (प्रतिनिधी)
 
4कोटक सिक्युरिटीज्चे प्रमुख दीपेन शाह यांनी सांगितले की, मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांनी मोठय़ा कंपन्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. भू-राजकीय तणावात घट आणि भविष्यात आर्थिक वाढीच्या संकेतांमुळे बाजार धारणा मजबूत झाली. अलीकडेच तेजीनंतर छोटय़ा कंपन्यांच्या शेअरमध्ये काही प्रमाणात नफेखोरी झाल्याचे दिसून आले. 
 
4एचडीएफसी बँक, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक, टीसीएस, अॅक्सिस बँक, हिंदाल्को, विप्रो आणि सिप्ला यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून आली. तिकडे एचडीएफसी, आयटीसी, भारती एअरटेल, कोल इंडिया, एचयूएल आणि हीरो मोटो कार्प यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदली गेली आहे.