मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक मंगळवारी उच्चंकावर बंद झाला असून, त्याने 8,362.65 चा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे, तर मुंबई शेअर बाजारात किरकोळ उलाढाली झाल्या असून, 35 अंकाच्या बढतीवर बाजार बंद झाला आहे. महागाई व औद्योगिक उत्पादनाचा आलेख लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्याचा दबाव मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावर आला आहे.
3क् शेअर असणारा मुंबई निर्देशांक मंगळवारी झालेल्या उलाढालीत 27,911.25 र्पयत पोहोचला, पण तिथे स्थिर न राहता 27,996.92र्पयत वर तर 27,79क्.4क् र्पयत खाली आला. 27,91क्.क्6 वर अखेर तो बंद झाला. ही वाढ 35.33 अंकांची असून, क्.क्13 टक्के आहे.
5क् शेअर असणा:या निफ्टी निर्देशांकाने आज उच्चंक गाठला. 8,362.85 वर पोहोचताना या निर्देशांकात 18.4क् अंकांची वाढ झाली असून, क्.22 टक्के
आहे.
12 नोव्हेंबर रोजी किरकोळ महागाई दर व औद्योगिक उत्पादनाचा दर जाहीर होणार आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्र घेत आहेत, असे रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी म्हटले आहे. बुधवारी जाहीर होत असलेल्या या दरामुळे बाजाराची पुढील दिशा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
शेअर बाजाराच्या 3क् शेअरपैकी 16 कंपन्यांचे शेअर चढते राहिले, तर 13 कंपन्यांचे शेअर खाली गेले. एम अँड एम (2.35 टक्के), टाटा स्टील(1.84) , अॅक्सिस बँक (1.42) , एचडीएफसी (1.क्9) , आयसीआयसीआय बँक (1.क्2), एल अँड टी (क्.86), रिलायन्स इंडस्ट्रीज (क्.85) यांचे शेअर चढते राहिले. (प्रतिनिधी)
4आजच्या जागतिक बाजारपेठेतील महत्त्वाच्या घटनाअंतर्गत ब्रेंट क्रूड तेल दर पिपामागे 82 डॉलरपेक्षाही खाली उतरले असून, हा चार वर्षाचा नीचांक आहे, असे बोनान्झा पोर्टफोलिओचे उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी म्हटले आहे.
4परदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी 355.3क् कोटी रु.चे शेअर्स खरेदी केले, असे शेअर बाजारातर्फे देण्यात आलेल्या पूरक माहितीत म्हटले आहे.