वाकोल्यात एमडीसह नायजेरियनला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:22+5:302021-03-18T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सांताक्रूझ परिसरात वाकाेला पाेलिसांनी मंगळवारी अमली पदार्थांसह एका नायजेरियनला अटक केली. कलिना परिसरात पालिका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सांताक्रूझ परिसरात वाकाेला पाेलिसांनी मंगळवारी अमली पदार्थांसह एका नायजेरियनला अटक केली.
कलिना परिसरात पालिका गल्लीमध्ये एक जण अमली पदार्थ बाळगत असल्याची माहिती वाकोला पोलीस ठाण्याच्या एटीसी विभागाला मिळाली हाेती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनयना नटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी एकाला अटक केली.
चांडेफॉरटे आक्रा असे अटक आराेपीचे नाव असून सध्या ताे ठाणे परिसरात वास्तव्यास आहे. नायजेरियन असलेल्या आक्राकडून पाेलिसांनी ३९ हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम एमडी जप्त केले. खासगी वापरासाठी हे एमडी आणल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र त्याचे अन्य काही साथीदार असल्याचा संशय पोलिसांना असून त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती नटे यांनी दिली.
.....................................