खारघरमध्ये नायजेरियन नागरिकास अटक
By admin | Published: May 25, 2014 03:32 AM2014-05-25T03:32:26+5:302014-05-25T03:40:41+5:30
पोलिस आयुक्तालय क्षेत्रात अनेक नायजेरियन नागरिक विनापरवाना वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे.
नवी मुंबई : पोलिस आयुक्तालय क्षेत्रात अनेक नायजेरियन नागरिक विनापरवाना वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. खारघरमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्या व्हिसाची मुदत फेब्रुवारीमध्येच संपल्याचे निदर्शनास आले आहे. नवी मुंबई, खारघर परिसरात अनेक नागरिक विनापरवाना येथे वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. खारघर से. १० मधून अशाच ३० वर्षीय नागरिकाला बुधवारी अटक करण्यात आले आहे. त्याचे नाव हेकेन किंबुचे असे आहे. विदेशी नागरिक कायदा १९४६ अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नायजेरीया येथून २५ आॅक्टोबर २०१३ रोजी कपडे व ज्वेलरी विकण्यासाठी मुंबई येथे हा इसम आला होता. मात्र २४ फेब्रुवारी २०१४ रोजी पासपोर्टची (विजा ) मुदत संपली आहे. यानंतरही तो खारघर सेक्टर १० मधील महावीर इमारतीत राहत होता . ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सायबर सेल गुन्हे शाखेच्या सचिन सोनावणे यांनी याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले . (प्रतिनिधी)