अमली पदार्थाच्या रॅकेटमुळे नायजेरियन रडारवर

By admin | Published: April 18, 2016 12:40 AM2016-04-18T00:40:46+5:302016-04-18T00:40:46+5:30

सोलापूरमधून आणलेला इफेड्रीन हा अमली पदार्थ सर्वप्रथम एका नायजेरियन तरुणाकडून पोलिसांनी जप्त केल्यानंतर हजारो कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा हस्तगत झाल्याने जिल्ह्यातील

Nigerian radar due to the drug racket | अमली पदार्थाच्या रॅकेटमुळे नायजेरियन रडारवर

अमली पदार्थाच्या रॅकेटमुळे नायजेरियन रडारवर

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
सोलापूरमधून आणलेला इफेड्रीन हा अमली पदार्थ सर्वप्रथम एका नायजेरियन तरुणाकडून पोलिसांनी जप्त केल्यानंतर हजारो कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा हस्तगत झाल्याने जिल्ह्यातील दिवा, मीरा रोड, भार्इंदर येथे बेकायदा वास्तव्य करणारे नायजेरियन पोलिसांच्या रडारवर आले आहेत. येत्या काही दिवसांत या भागात कोम्बिंग आॅपरेशन करण्याचे संकेत उच्चपदस्थ सूत्रांनी दिले. हे अमली पदार्थ येऊर अथवा घोडबंदर रोड किंवा कर्जत-शहापूर येथील फार्महाऊसवर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये वापरले गेले किंवा कसे, या दिशेने पोलीस तपास सुरू झाला आहे.
डायघर भागातील ओकाय सिप्रेन चिन्नासा या नायजेरियन तरुणाकडे इफेड्रीन सापडले. त्यानंतर, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोघांना अटक केली. त्यांनीच सोलापूरमधील कंपनीतून ईडी ड्रग्जचा साठा मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे अगोदरच अमली पदार्थांच्या विक्रीच्या क्षेत्रातील नायजेरियनकडून या अमली पदार्थाचीही विक्री होत आहे किंवा कसे, हे तपासण्यासाठी नायजेरियन लोकांचे वास्तव्य असलेल्या दिवा, मीरा रोड तसेच भार्इंदरच्या नयानगर भागावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘एमडी’ पावडर विक्रीमध्ये नायजेरियन्सचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. आता नायजेरियनकडून ‘ईडी’ची पावडर मिळाल्यामुळे या अमली पदार्थाच्या विक्रीतही त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता त्यांच्यावर कारवाईचे संकेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले. सोलापुरातील कंपनी आणि ठाणे, नवी मुंबईतील नायजेरियन्स यांच्यात कोणती लिंक आहे, त्यांचा पुरवठादार कोण आहे, त्यादृष्टीनेही कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: Nigerian radar due to the drug racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.