Join us

मध्य रेल्वे मार्गावर उद्या रात्रकालीन ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 06:00 IST

ब्लॉक काळात कल्याणहून सीएसएमटीसाठी सुटणारी रात्री ९ वाजून ५४ मिनिटांची आणि रात्री १० वाजून २४ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते दिवा यादरम्यान पायाभूत कामे करण्यासाठी बुधवार, १० एप्रिल रोजी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून ते पहाटे ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत तब्बल पाच तासांचा रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गिकेवर घेतला जाईल. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

ब्लॉक काळात कल्याणहून सीएसएमटीसाठी सुटणारी रात्री ९ वाजून ५४ मिनिटांची आणि रात्री १० वाजून २४ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे सुटणारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांची आणि पहाटे ४ वाजून ४१ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे. रात्री १० वाजून ३२ मिनिटांची कल्याणहून सीएसएमटीसाठी सुटणारी जलद लोकल १० वाजून ५४ मिनिटांनी कल्याण ते दिवा दरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येईल. सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.जीर्ण पादचारी पूल होणार जमीनदोस्तच्मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी दिशेकडील कल्याण ते दिवा दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत दिवा येथील सीएसएमटी दिशेकडील जीर्णावस्थेतील पादचारी पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे.च्सीएसएमटी येथील हिमालय पुलाची दुर्घटना घडल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. ब्रिटिशकालीन आणि जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती आणि तोडकाम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिवा स्थानकातील पादचारी पुलाचे तोडकाम करण्यात येणार आहे.