दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान १८ डिसेंबरपर्यंत रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:26 AM2018-12-14T05:26:58+5:302018-12-14T06:28:50+5:30

विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी स्थानकांवर थांबा नाही; विद्याविहार ते भायखळादरम्यान धिम्या लोकल वळवणार जलद मार्गावर

Night block from Dadar and Matunga stations till 18th December | दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान १८ डिसेंबरपर्यंत रात्रकालीन ब्लॉक

दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान १८ डिसेंबरपर्यंत रात्रकालीन ब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप-डाऊन धिम्या आणि जलद मार्गावर मध्य रेल्वेने १८ डिसेंबरपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर, विद्याविहार, करी रोड आणि चिंचपोकळी या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

प्रवाशांना सेवासुविधा पुरवण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठीच हा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात शुक्रवारी रात्री सीएसएमटी येथून ११ वाजून ४८ मिनिटांनी आणि १२ वाजून ३१ मिनिटांनी धावणारी कुर्ला लोकल रद्द करण्यात आली आहे. तर, रविवारी कुर्ला स्थानकाहून सीएमएमटीसाठी रवाना होणारी ४ वाजून ५१ मिनिटांची आणि ५ वाजून ५४ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी अप आणि व डाऊन जलद मार्गावर रात्री ११ वाजून १५ मिनिटे ते पहाटे ६ वाजेपर्यंत आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ते ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे शनिवारी रात्री ११ ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत डाऊन मेल-एक्स्प्रेस फलाट क्रमांक ४ वरून रवाना होतील. तर भुसावळ-सीएसएमटी-भुसावळ आणि पुणे-सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्ययात आली आहे.

रविवारी आणि सोमवारी अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १ वाजून १५ मिनिटे ते पहाटे ६ वाजेपर्यंत आणि दादर टर्मिनसवर मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ४५ मिनिटे ब्लॉक असेल. यामुळे शनिवारी रात्री ११ ते १२ वाजून ३० मिनिटे या वेळेत डाऊन मार्गावर मेल-एक्स्प्रेस फलाट क्रमांक ४ वरून रवाना होतील. तर, कसारा आणि कर्जत अप जलद रेल्वे मुलुंड ते परळ स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

कसारा, कर्जत जलद लोकलचा बदलला मार्ग
सोमवार १७ आणि मंगळवार १८ डिसेंबर रोजी अप आणि डाऊन मार्गासह दादर टर्मिनसवर रात्री १२ वाजून ४५ मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटे या दरम्यान ब्लॉक असेल. यामुळे सोमवारी रात्री कसारा आणि कर्जत अप जलद लोकलचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यानुसार या लोकल मुलुंड ते परळ स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉक काळात सोमवारी सीएसएमटीहून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि मंगळवारी ठाणे आणि कुर्ला येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Web Title: Night block from Dadar and Matunga stations till 18th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.