टिटवाळा येथे आज रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 05:00 AM2020-02-29T05:00:12+5:302020-02-29T05:00:25+5:30
वेळापत्रकात बदल; १५ लोकल रद्द, तर १३ गाड्यांच्या मार्गात बदल
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा येथे २९ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल. या वेळी टिटवाळा येथील विद्युत कामे केली जातील. शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी रात्री २.३० पर्यंत सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर तीन तासांचा ब्लॉक घेतला जाईल. तसेच रविवारी रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत तीन तासांचा ब्लॉक आंबिवली, खडावली या दिशेकडे जाणाºया मार्गावर घेण्यात येईल. परिणामी, टिटवाळ्याकडे येणाºया आणि जाणाºया १५ लोकल रद्द केल्या जातील. तर, १३ लोकलच्या मार्गात बदल केला जाईल.
२९ फेब्रुवारी; टिटवाळ्याकडील रद्द होणाऱ्या लोकल
रात्री ९.५४ सीएसएमटी-कल्याण, रात्री ८.३० सीएसएमटी-टिटवाळा, रात्री ९.२० सीएसएमटी-टिटवाळा, रात्री १० सीएसएमटी-टिटवाळा, रात्री १०.५१ सीएसएमटी-टिटवाळा.
२९ फेब्रुवारी; सीएसएमटीकडील रद्द होणाऱ्या लोकल
रात्री ११.०५ कल्याण-सीएसएमटी, रात्री ८.३७ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री ९ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री ९.२४ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री १०.०६ टिटवाळा-सीएसएमटी, रात्री ११.१४ ची टिटवाळा-ठाणे, रात्री ११.२५ ची टिटवाळा-ठाणे.
१ मार्च; या लोकल मार्गात बदल
पहाटे ५.३५ टिटवाळा-सीएसएमटी लोकल कल्याणहून सुटेल. टिटवाळा-कल्याण सेवा रद्द.
१ मार्च; सीएसएमटीकडील रद्द होणाऱ्या लोकल
पहाटे ४.०१ टिटवाळा-सीएसएमटी, पहाटे ४.३२ टिटवाळा-सीएसएमटी, पहाटे ५.११ टिटवाळा-सीएसएमटी.
२९ फेब्रुवारी रोजी या लोकलच्या मार्गात बदल
सायंकाळी ६.३४, सायंकाळी ७.३०, रात्री ८.०५ सीएसएमटी-टिटवाळा लोकल आसनगावपर्यंत धावेल.
सायंकाळी ७.४६ सीएसएमटी-टिटवाळा लोकल कल्याणपर्यंतच धावेल.
रात्री ११.२० सीएसएमटी-टिटवाळा लोकल कसारापर्यंत धावेल.
रात्री ११.४४ सीएसएमटी-टिटवाळा लोकल कल्याणपर्यंत धावेल.
विशेष लोकल
सीएसएमटी-टिटवाळा विशेष लोकल २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३४, सायंकाळी ७.३०, रात्री ८.०५ ला सुटेल. या तिन्ही विशेष लोकल आसनगावपर्यंत धावतील. तर, रात्री ८.४८, रात्री ९.२५, रात्री १०.२५ आसनगाव-सीएसएमटी विशेष लोकल धावेल.