कल्याण ते टिटवाळादरम्यान रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:41 AM2019-06-08T03:41:01+5:302019-06-08T03:41:13+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव पाच तासांचा जम्बोब्लॉक

Night block of train between Kalyan and Titwala | कल्याण ते टिटवाळादरम्यान रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

कल्याण ते टिटवाळादरम्यान रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

googlenewsNext

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते टिटवाळा रात्रकालीन पॉवर ब्लॉक रविवार, ९ जून रोजी घेण्यात येईल. कल्याण ते टिटवाळा यादरम्यान ९ जून रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असेल. या वेळी रेल्वे रूळ मार्गाची उंची वाढविण्यात येईल.

८ जून रोजी रात्री १० वाजून १६ मिनिटांची सीएसएमटी-कल्याण लोकल, रात्री १०.२४ची सीएसएमटी-कल्याण, रात्री ११.४४ वाजताची सीएसएमटी-टिटवाळा, ९ जून रोजी मध्यरात्री १२.०५ची सीएसएमटी-अंबरनाथ या लोकल रद्द केल्या आहेत. ८, ९ जून रोजी रात्री ०९.०४ मिनिटांची कल्याण-सीएसएमटी लोकल, रात्री ०९.२०ची कल्याण-सीएसएमटी, रात्री १०.०१ वाजताची अंबरनाथ-सीएसएमटी, रात्री १०.०६ मिनिटांची टिटवाळा-सीएसएमटी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव पाच तासांचा जम्बोब्लॉक
रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव यादरम्यान पाचव्या मार्गिकेवर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बोब्लॉक असेल. ब्लॉकमुळे या मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत.

Web Title: Night block of train between Kalyan and Titwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल