नाईट कर्फ्यूमध्ये 'या' गोष्टींना मुभा; नांगरे-पाटील यांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 09:03 PM2020-12-23T21:03:14+5:302020-12-23T21:04:33+5:30

Night Curfew in Mumbai : अत्यावश्यक सेवा सुरु असून पाचपेक्षा कमी व्यक्ती ११ नंतर घराबाहेर पडू शकतात. त्यामुळे मुंबईकरांना नववर्षाच्या स्वागतासाठी थोडासा दिलासा मिळणार आहे. 

Night curfew allows 'these' things; Important information of Nangre-Patil | नाईट कर्फ्यूमध्ये 'या' गोष्टींना मुभा; नांगरे-पाटील यांची महत्त्वाची माहिती

नाईट कर्फ्यूमध्ये 'या' गोष्टींना मुभा; नांगरे-पाटील यांची महत्त्वाची माहिती

Next
ठळक मुद्देनागरिक दुचाकी आणि चार चाकी वाहनांतून प्रवेश करु शकतात. मात्र कारमध्ये चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही.

कोरोनाबाबत राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. नाताळ आणि नव वर्ष लक्षात घेता मुंबईसह राज्यभर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) जारी करण्यात आला आहे. त्यातच मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. मुंबई पोलीस दलाचे कायदा आणि सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी  माहिती दिली आहे की, मुंबईकरांनो, कर्फ्यू आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरु असून पाचपेक्षा कमी व्यक्ती ११ नंतर घराबाहेर पडू शकतात. त्यामुळे मुंबईकरांना नववर्षाच्या स्वागतासाठी थोडासा दिलासा मिळणार आहे. 

 

मुंबईत नाईट कर्फ्यू दरम्यान पाच पेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र जमण्यास मनाई असून, संचाराला बंदी नसल्याचे विश्वास नांगरे पाटिल यांनी सांगितले आहे. त्यामुळे या दरम्यान नागरिक त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडू शकतात असेही त्यांनी नमूद केले आहे.  नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने, मुंबई पोलिसांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यू आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी आहे. यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध आहेत. नाईट शिफ्टच्या सर्व व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटरला ११ वाजता बंद होणे सक्तीचे आहे. त्या व्यतिरिक्त अन्य व्यवसायाला तसेच सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. नागरिक दुचाकी आणि चार चाकी वाहनांतून प्रवेश करु शकतात. मात्र कारमध्ये चार पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. आपण कर्फ्यूच्या वेळी फिरायला जाऊ शकता किंवा गाडी चालवू शकता फक्त पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. यदरम्यान नागरिकांनी मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करावे असेही त्यांनी नमूद केले आहे.

 

Web Title: Night curfew allows 'these' things; Important information of Nangre-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.