सहआयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाईट ड्युटी, पांडेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:14 AM2022-03-31T08:14:44+5:302022-03-31T08:15:07+5:30

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे आदेश

Night duty to senior officers including Joint Commissioners | सहआयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाईट ड्युटी, पांडेंचे आदेश

सहआयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाईट ड्युटी, पांडेंचे आदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यातच आता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही ‘नाईट ड्युटी’  करावी लागणार आहे. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.

संजय पांडे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पोलीस सहआयुक्तांना १५ दिवसांतून एकदा नाईट ड्युटी करावी लागणार आहे. तर अपर पोलीस आयुक्तांना १० दिवसांतून एकदा  नाईट ड्युटी करावी लागणार आहे. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाईट ड्युटी नव्हती. रात्री-अपरात्री  महत्त्वाची घडामोड घडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असावे त्यानुसार हे निर्णय घेण्यात येत आहेत. 
भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १६६ नुसार, सरकारी कर्मचारी जो कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने, कायद्याचे उल्लंघन करतो. तसेच जो एखाद्याचा अपमान करतो, त्यावर या कलमांतर्गत कारवाई केली जाते.

मोबाईल चोरीही आता दखलपात्र गुन्हा
मुंबईत मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्या तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस फक्त हरवल्याची तक्रार नोंदवून घेतात; मात्र आता दखलपात्र गुन्हा नोंदवणे बंधनकारक आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. तसेच मिसिंग प्रॉपर्टीबाबत कोणतीही नोंदवही ठेवू नये, असेही पांडे यांनी नमूद केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यावर भा.द.वि कलम १६६ (अ) अन्वये कारवाई करण्यात येईल, अशा सूचना आयुक्तांनी दिल्याचे समजते.

Web Title: Night duty to senior officers including Joint Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.