Join us

‘गर्डर’साठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक, मेल-एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:31 AM

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक २ व ३ दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर ५ तास १५ मिनिटांचा विशेष रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक २ व ३ दरम्यान पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवर ५ तास १५ मिनिटांचा विशेष रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री १२.५० ते रविवारी सकाळी ६.०५ वाजेपर्यंत मुलुंड ते कळवादरम्यान धिम्या मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. यामुळे सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या साधारणपणे १० ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.शनिवारी रात्री १२.३४ ते रविवारी सकाळी ६.१० या वेळेत डाऊन धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येईल. तर, अप धिम्या मार्गावरील लोकल पहाटे ३.४८ ते पहाटे ५.५३ दरम्यान दिवा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून चालविण्यात येईल. त्यामुळे या कालावधीत लोकल गाड्या कळवा आणि मुंब्रा स्थानकावर थांबणार नाहीत.डाऊन धिम्या मार्गावरील सीएसएमटी-ठाणे (रात्री १२.३४ आणि पहाटे ६.४८) तर सीएसएमटी-डोंबिवली (सकाळी ६.३२ आणि ७.१६)ची लोकल रद्द करण्यात आली आहे. अप मार्गावरील कल्याण-सीएसएमटी (रात्री ९.२०), कल्याण-ठाणे (रात्री ११.३९, ११.५८)ची तसेच ठाणे-सीएसएमटीदरम्यान पहाटे ४ ते ६.१६ वाजेपर्यंतच्या आठ लोकल फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. डोंबिवली-सीएसएमटी (सकाळी ८.१४ आणि ८.४१)ची लोकलही रद्द करण्यात आली आहे.तर, सीएसएमटी-कल्याण (रात्री १०.२४), सीएसएमटी-ठाणे (रात्री ११.३९), सीएसएमटी-ठाणे (रात्री ११.५९ ) लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच धावेल. कुर्ला-अंबरनाथ लोकल कुर्ला स्थानकाऐवजी मुंब्रा स्थानकातून चालविण्यात येईल. पहाटे ५.२८ वाजता सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी सुटणारी लोकल आणि सीएसएमटीहून सकाळी ६.१२ची टिटवाळा लोकल मुंब्रा स्थानकातून टिटवाळासाठी निघेल.

टॅग्स :मध्ये रेल्वे