लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीच्या वेळी वाहनांमुळे श्वानांना होणाऱ्या अपघातात त्यांचा मृत्यू किंवा मोठी दुखापत होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून बाेरीवलीतील माणुसकी नावाची सामाजिक संस्था भटक्या श्वानांना शनिवारपासून नाइट रिफ्लेक्ट बेल्ट बांधणार असल्याची माहिती संस्थेचे संदेश कोलापटे यांनी दिली.
सध्या हा प्रयोग बोरीवलीत होत असला तरी भविष्यात संपूर्ण मुंबईत उपक्रम राबविला जाईल. यासाठी पशु वैद्यक मनीष पिंगळे मार्गदर्शन करत आहेत. नाइट रिफ्लेक्ट बेल्ट बसविल्यानंतर वाहनचालकास रस्त्यालगत अथवा रस्त्यामध्ये बसलेले श्वान दिसू शकले. त्यामुळे त्यांच्या शरीराहून वाहन जाणार नाही आणि त्यांना दुखापत होणार नाही, असे संस्थेकडून सांगण्यात आले. दरम्यान, सुरुवातीला २० किंवा २५ भटक्या श्वानांना बेल्ट बांधला जाईल. त्यानंतर यात वाढ केली जाईल.
......................