मुंबई : गौरी विसर्जनानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रात्रकालीन विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने २३-२४ सप्टेंबरच्या रात्री चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान आठ लोकल फेºया चालविण्याची घोषणा केली.गणेशोत्सवातमध्य रेल्वेतर्फे १८-१९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत सीएसएमटी ते कल्याण मार्गावर विशेष लोकल धावेल. ही लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, कल्याण स्थानकात मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.पश्चिम रेल्वेवर चर्चगेट येथून विरारकडे जाणारी पहिली विशेष लोकल अनंत चतुर्दशीच्या रात्री १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसरी विशेष लोकल १ वाजून ५५ मिनिटे, तिसरी विशेष लोकल २ वाजून २५ मिनिटे आणि शेवटची विशेष लोकल ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. मध्य रेल्वेच्या रात्रकालीन विशेष लोकलमुळे रात्री उशिरा घरी परतणाºया भाविकांना दिलासा मिळेल.अनंत चतुर्दशीच्या रात्री (रविवार-सोमवार) विशेष लोकल :चर्चगेट ते विरार : १:१५, १:५५, २:२५, ३:३०विरार ते चर्चगेट : ००:१५, ००:४५, १:४०, ३:१५
मध्य रेल्वेवर आजपासून विसर्जनापर्यंत रात्रकालीन विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 6:18 AM