पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन जम्बोब्लॉक, रविवार सकाळचा मेगाब्लॉक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:57 AM2017-11-18T01:57:54+5:302017-11-18T02:04:59+5:30

पश्चिम रेल्वेवर दुरुस्तीच्या कामानिमित्त रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान १८ व १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटेच्या ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

 Nightmare jumblocks on the Western Railway route, canceled mega block on Sunday | पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन जम्बोब्लॉक, रविवार सकाळचा मेगाब्लॉक रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन जम्बोब्लॉक, रविवार सकाळचा मेगाब्लॉक रद्द

Next

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दुरुस्तीच्या कामानिमित्त रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान १८ व १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटेच्या ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
बोरीवली व गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवार १८ व रविवार १९ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळेस दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे या काळातील काही लोकल फेºया रद्द करण्यात येतील. ब्लॉक काळात बोरीवली स्थानकातील फलाट क्रमांक १ ते ४ वरून एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पश्चिम रेल्वेवर विविध स्थानकांत पादचारी पुलांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे रुळांसह, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती व देखभालीचे काम यापुढे रविवारच्या मेगाब्लॉकव्यतिरिक्त रात्रीच्या वेळेस करण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
रविवार सकाळचा मेगाब्लॉक रद्द-
पश्चिम रेल्वे मार्गावर दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे रविवारी दिवसा असणारा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. परिणामी रविवारी सकाळी प्रवास करणाºया प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Web Title:  Nightmare jumblocks on the Western Railway route, canceled mega block on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.