निकम यांना दिवसाला ५० हजार फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:43 AM2018-05-22T01:43:49+5:302018-05-22T01:43:49+5:30

कोथळे हत्या प्रकरण : सल्ल्यासाठी तासाला मिळणार १५ हजार

Nikam gets 50 thousand rupees a day | निकम यांना दिवसाला ५० हजार फी

निकम यांना दिवसाला ५० हजार फी

Next

मुंबई : महाराष्टÑ पोलिसांची काळी बाजू चव्हाट्यावर आलेल्या सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील ‘खाकी वर्दी’तील आरोपींना धडा शिकविण्यासाठी राज्य सरकारने मोठा मोबदला चुकविण्याची तयारी दर्शविली आहे. या खटल्यात न्यायालयात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना एका दिवसाच्या सुनावणीसाठी ५० हजार रुपये शुल्क देण्यात येणार आहे. तर याच प्रकरणात तपास अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्यासाठी एका तासाला तब्बल १५ हजार रुपये मोजणार आहे. त्यांच्या मुक्कामासाठी हॉटेल व प्रवासासाठी स्वतंत्रपणे खर्च केला जाणार आहे.
अ‍ॅड. निकम यांना या खटल्यात व्यावसायिक फी देण्याबाबत विधि विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार खटल्यातील सुनावणीच्या पहिल्या तारखेपासून निश्चित केलेले शुल्क त्यांना मिळेल.
गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला सांगली पोलीस ठाण्यच्या कोठडीत पोलिसांनी अनिकेत कोथळेची निर्घृण हत्या करून प्रेत आंबोळी घाटात नेऊन जाळले. सरकारने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली. त्यांच्या सूचनेनुसार तपास अधिकाºयांनी तपास करून आरोपपत्र सांगली सत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यासाठी प्रत्येक दिवसाच्या परिणामकारक सुनावणीसाठी निकम यांना ५० हजार रुपये, तर विचारविनिमयासाठी एका तासाला १५ हजार रुपये दिले जातील. हॉटेलच्या मुक्कामासाठी प्रतिदिन ५ हजार शुल्क दिले जाईल. शिवाय निकम यांना रेल्वे प्रवासाचा खर्च दिला जाणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण?
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला एका अभियंत्याला लुबाडल्याच्या कारणावरून अनिकेत कोथळे व त्याचा साथीदार अमोल भंडारे यांना अटक केली. त्याच रात्री उपनिरीक्षक युवराज कामटे व चौघा पोलिसांनी त्यांना अमानुषपणे मारले. यात कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर दोघे जण कोठडीतून पळून गेल्याची डायरी बनविण्यात आली. पहाटे कोथळेचा मृतदेह अंबोली घाटात नेऊन पोलिसांनी पेट्रोल ओतून जाळला. भंडारेच्या जबाबातून ही बाब समोर आल्यानंतर सांगली बंद पुकारण्यात आला. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख व उपअधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

Web Title: Nikam gets 50 thousand rupees a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.