ट्रान्झिट जामिनासाठी निकिता जेकब उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:47+5:302021-02-16T04:07:47+5:30

टूलकिट प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कृषी कायद्याविरोधात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात ‘टूलकिट’ प्रसार करणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा ...

Nikita Jacob in the High Court for transit bail | ट्रान्झिट जामिनासाठी निकिता जेकब उच्च न्यायालयात

ट्रान्झिट जामिनासाठी निकिता जेकब उच्च न्यायालयात

Next

टूलकिट प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कृषी कायद्याविरोधात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात ‘टूलकिट’ प्रसार करणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याचप्रकरणी व्यवसायाने वकील असलेली निकिता जेकबही संशयित आहे. तिने ट्रान्झिट अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने जेकब आणि अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, थनबर्ग आणि जेकब या दोघींनी ‘टूलकिट’ तयार केले. तसेच या दोघी खलिस्तानच्या समर्थकांशी थेट संपर्कात होत्या. जेकबने दाखल केलेल्या या याचिकेवरील सुनावणी न्या. प्रकाश नाईक यांच्या एक सदस्यीय खंडपीठापुढे होती. जेकबने चार आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. आपल्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा खोटा आहे, असे जेकबने याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.

..................

Web Title: Nikita Jacob in the High Court for transit bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.