'आजोबां'बद्दल निलेश राणे खोचक बोलले, नातू रोहित पवारांनी एकाच वाक्यात 'समजावले'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 07:41 PM2020-05-16T19:41:25+5:302020-05-16T19:42:25+5:30

कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अभूतपूर्व लॉकडाऊनने साखर उद्योगाला निर्माण झालेल्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण तातडीने हस्तक्षेप करत

Nilesh Rane spoke sharply about 'Sharad pawar', grandson Rohit Pawar 'explained' by twitter MMG | 'आजोबां'बद्दल निलेश राणे खोचक बोलले, नातू रोहित पवारांनी एकाच वाक्यात 'समजावले'!

'आजोबां'बद्दल निलेश राणे खोचक बोलले, नातू रोहित पवारांनी एकाच वाक्यात 'समजावले'!

Next

मुंबई - भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे महाविकास आघाडी सरकारवर किंवा शिवसेना नेत्यांवर कायम टीका करताना दिसतात. निलेश यांनी यापूर्वीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना टार्गेट केलं आहे. मात्र, शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासंदर्भातील बातमीच उल्लेख करत निलेख राणे यांनी साखर उद्योगासंदर्भात टिपण्णी केली. तसेच, साखर उद्योग वाचवा? असा खोचक टोलाही लगावला. मात्र, आजोबांबद्दलच्या या खोचक टोल्यावर नातू रोहित पवार यांनी उत्तर दिलं. 

कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अभूतपूर्व लॉकडाऊनने साखर उद्योगाला निर्माण झालेल्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण तातडीने हस्तक्षेप करत भरीव मदत करावी अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. यासंदर्भातील एका बातमीचा संदर्भ देत निलेश राणे यांनी पवारांना टार्गेट केलं. 

''साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??
साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र'', अशा आशयाचं ट्विट निलेश राणेंनी केलं  आहे. या ट्विटला खोचक टोला लगावत, शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी उत्तर दिलंय. 

''मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी'', असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यानी आपल्या ट्विटमधील कुक्कुटपालन या शब्दावर जोर देत, हा शब्द इन्वर्टेडमध्ये लिहिला आहे. यावर, अनेकांनी कमेंट करुन रोहित पवारांचं समर्थन केलंय. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रासोबत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेच्या अध्यक्षांचे सविस्तर पत्र शरद पवार यांनी जोडले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीपासूनच साखर उद्योग संकटात होता. त्यावेळी आपण इथेनॉलच्या उत्पादनासाठी किमान हमीभाव, साखरेची निर्यात, राखीव साठा, भांडवली खर्चावरील व्याजापोटी दिले जाणारे अनुदान इत्यादी आर्थिक उपाययोजना करण्यावर भऱ दिला. आता कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असतानाही आपण काही धोरणात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त करतानाच यासंदर्भात साखर कारखाने महामंडळ लिमीटेडने काही उपाययोजना सुचवल्या आहेत.
 

Web Title: Nilesh Rane spoke sharply about 'Sharad pawar', grandson Rohit Pawar 'explained' by twitter MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.