सेना भवनाच्या आत नेऊन फटके टाकणार, निलेश राणेंची संजय राऊतांना थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 04:31 PM2021-08-02T16:31:29+5:302021-08-02T16:32:57+5:30

प्रसाद लाड यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हं असताना त्यांनी सारवासारवही केली. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असं म्हणत लाड यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील दादरमध्ये काल भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडला.

Nilesh Rane's one-sided criticism on Sanjay Raut about conflict on shivsena bhavan mumbai | सेना भवनाच्या आत नेऊन फटके टाकणार, निलेश राणेंची संजय राऊतांना थेट धमकी

सेना भवनाच्या आत नेऊन फटके टाकणार, निलेश राणेंची संजय राऊतांना थेट धमकी

googlenewsNext
ठळक मुद्देहिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यानंतर, आता भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. 

मुंबई - भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच खवळले आहेत. तर, शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अनुल्लेखानं मारलं. यावर मी काय बोलणार. आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील, असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. या वादात आता नारायण राणेपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. 

प्रसाद लाड यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हं असताना त्यांनी सारवासारवही केली. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असं म्हणत लाड यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील दादरमध्ये काल भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी लाड यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं. 'आता आपण माहिममध्ये आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,' असं लाड म्हणाले. लाड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  

लाड यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका बोलून दाखवली. शिवेसना भवन फोडण्याची भाषा करणारे भूमिगत झाल्याचं कळलं आहे. हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यानंतर, आता भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. 

संजय राऊत याला सेनाभवनच्या आत नेऊन फटके टाकणार, काय दिवस आलेत. शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय, अशा शब्दात निलेश राणेंनी संजय राऊत यांना टार्गेट केलंय. 

संजय राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना भवनासमोर राडा झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला गुंडा पार्टी म्हणून संबोधले होते. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं होतं. शिवसेना गुंडगिरी करते. पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता तर वेगळं चित्र दिसलं असतं. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.
 

Read in English

Web Title: Nilesh Rane's one-sided criticism on Sanjay Raut about conflict on shivsena bhavan mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.