मुंबई : कोरोना काळात आलेली वीजबिले अद्याप ग्राहकांनी भरलेली नाहीत. महावितरणच्या एकट्या भांडुप परिमंडळाचा विचार केल्यास सुमारे साडेनऊ लाख वीजग्राहकांनी एकूण ५७२ कोटी रुपयांची बिले थकविली.
वीजग्राहकांना थकबाकीची रक्कम भरणे साेपे व्हावे म्हणून महावितरणने नवे धोरण आणले आहे. त्यानुसार, थकबाकीदार वीजग्राहकांना ३० टक्के वीजबिल भरून उर्वरित थकबाकी ३ हफ्यांत भरण्याची मुभा आहे. या धोरणानुसार थकीत वीजबिल असलेले ग्राहक तसेच थकबाकीमुळे ज्यांची जोडणी खंडित केली, ज्या ग्राहकांचा न्यायालयातर्फे हुकूमनामा पारित झाला, ज्या ग्राहकांचे वीजबिलाबाबत महावितरणविरुद्ध दावे प्रलंबित आहेत; इत्यादी सर्व ग्राहकांसाठीही वीजबिल भरुन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. तरीही भांडुप परिमंडळात अद्याप ९ लाख ४१ हजार ४६ ग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही.