Join us  

पश्चिम रेल्वेच्या आठ स्थानकांवर नऊ पूल

By admin | Published: March 02, 2016 2:27 AM

रेल्वे स्थानकांतील प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर सहज जाता यावे आणि रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळता यावेत, यासाठी जास्तीत जास्त पादचारी पूल उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला

मुंबई : रेल्वे स्थानकांतील प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर सहज जाता यावे आणि रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळता यावेत, यासाठी जास्तीत जास्त पादचारी पूल उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. येत्या आर्थिक वर्षात आठ स्थानकांवर नऊ पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. पादचारी पुलांच्या कमतरतेमुळे आणि त्यावर होणाऱ्या गर्दीमुळे स्थानकातच रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. खार, एल्फिन्स्टन, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, भार्इंदर, विरार स्थानकांत पादचारी पूल उभारले जातील. कांदिवली स्थानकात दोन तर उर्वरित सर्व स्थानकांत प्रत्येकी एक पादचारी पूल उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. बोरीवलीत १२ मीटर रुंदीचा पूल उभारणार असून, यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भार्इंदरसाठी १ कोटी २० रुपये मंजूर झाले आहेत. गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीतील पुलांसाठीही ९ कोटी ५0 लाख रुपये रेल्वे देण्यात येणार आहेत. (प्र्रतिनिधी)