Join us

मुंबई CSMT स्टेशनच्या पुनर्विकासाच्या कॉट्रॅक्टसाठी अदानीसह या नऊ कंपन्या शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 10:10 AM

Mumbai CSMT station: सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंट योजनेंतर्गत या स्टेशनचे रूपांतर एका मिनी स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा विचार आहे.

मुंबई - मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची योजना रेल्वेने आखली आहे. (Redevelopment of the Mumbai CSMT station) या पुनर्विकासाच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी गौतम अदानी यांच्या अदानी रेल्वेजसह जीएमआर एंटरप्रायझेस, ओबेरॉयल रियाल्टी यासह एकूण नऊ कंपन्या शर्यतीमध्ये आहेत. इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (IRSDC) ने ही माहिती दिली आहे. (The nine companies, including Adani railways, are vying for a contract for the redevelopment of the Mumbai CSMT station)

सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंट योजनेंतर्गत या स्टेशनचे रूपांतर एका मिनी स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा विचार आहे. येथे लोक राहतीत, काम करतील, खेळतील आणि ट्रेनमधून प्रवासही करतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल. तसेच व्यवसायाच्या संधीही उपलब्ध होतील. 

पुनर्विकासानंतर या स्टेशनमधून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. तसेच त्यांचा प्रवासाचा अनुभवही सुधारेल. या स्थानकावर रिडेव्हलपमेंटचे कॉट्रॅ्क्ट मिळवण्यासाठी लिलावात उतरत असलेल्या नऊ कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत. गोदरेज प्रॉपर्टीज, एंकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स, आयएसक्यू आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन, मॉरिबस होल्डिंग प्रा.लि. आणि बीआयएफ आयव्ही इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआयएफसी प्रा.लि.,पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. लोहिया यांनी सांगितले की, सीएसएमटी स्टेशनच्या पुनर्विकासासाठी नऊ कंपन्यांची RFQ (रिक्वेस्ट फॉर क्वोटेशन)साठी निवड झाली आहे. पुढच्या टप्प्यात आयआरएसडीसी एक रिक्वेस्ट फॉर प्रपोजल जारी करेल. हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आम्ही सीएसएमटी स्टेशनला एक अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट हब बनवण्यासाठी कटीबद्ध आहोत. 

आयआरएसडीसीने सांगितले की, या स्टेशनच्या पुनर्विकासावर सुमारे १ हजार ६४२ कोटी रुपये एवढा खर्च होणार आहे. हा खर्च डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सपोर्ट DBFOT च्या आधारावर काम करेल. रेल्वे खासगी क्षेत्रातील सहकार्यामधून एकूण १२३ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची योजना आखत आहे. रेल्वे या ज्या १२३ रेल्वे स्टेशनवर पुनर्विकासाची योजना आखत आहे. त्यापैकी ६३ स्टेशनवर आयआरएसडीसी आमि ६० स्टेशनवर आरएलडीए काम करेल. या सर्व स्टेशनच्या पुनर्विकासावर सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबईमध्य रेल्वेभारतीय रेल्वेव्यवसायअदानी