सुरेश लोखंडे, ठाणेठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) ५५ गटांसह पाच पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी २८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ग्रामीण भागात पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी सुमारे आठ लाख ९६ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा तयार करण्यात आल्यामुळे ठाणे जिल्हा परिषद बरखास्त झाली होती. तत्कालीन ६६ सदस्यांच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या आता ५५ सदस्यांसह व कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी या पाच पंचायत समित्यांच्या ११० सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांकडून या निवडणुकीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यातील योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील आठ लाख ९६ हजार मतदार २८ जानेवारी रोजी मतदान करणार आहेत. ठाणे जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी चार जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी महिलांसाठी दोन जागा राखीव आहेत. याशिवाय, अनुसूचित जमातीच्या (एसटी) उमेदवारांसाठी ११ जागा राखीव असून सात जागांवर एसटीच्या महिला उमेदवारांची निवड होणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (नामाप्र) १५ जागा असून त्यातील आठ जागा या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ जागा सोडण्यात आल्या आहेत. यातील ११ जागा सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत.
जि.प., पं.स.साठी नऊ लाख मतदार
By admin | Published: January 11, 2015 11:23 PM