मुंबईत काेराेनाचे आणखी नऊ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:07 AM2021-01-03T04:07:39+5:302021-01-03T04:07:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत शुक्रवारी ६३१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर ६२८ रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत ९३ ...

Nine more victims of Kareena in Mumbai | मुंबईत काेराेनाचे आणखी नऊ बळी

मुंबईत काेराेनाचे आणखी नऊ बळी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ६३१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर ६२८ रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११,१२५ झाला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ३६५ दिवसांवर पाेहाेचला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार सध्या आठ हजार पाच सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत दोन लाख ७४ हजार ७२ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या नऊ कोरोना रुग्णांपैकी सात रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यूंपैकी चार रुग्ण पुरुष आणि पाच रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी सात जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित दोन रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा दोन लाख ९४ हजार ६७ एवढा आहे. तर, आतापर्यंत २३ लाख ७० हजार ५९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Nine more victims of Kareena in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.