Join us

मुंबईत काेराेनाचे आणखी नऊ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शुक्रवारी ६३१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर ६२८ रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत ९३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ६३१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर ६२८ रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११,१२५ झाला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ३६५ दिवसांवर पाेहाेचला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार सध्या आठ हजार पाच सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत दोन लाख ७४ हजार ७२ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या नऊ कोरोना रुग्णांपैकी सात रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यूंपैकी चार रुग्ण पुरुष आणि पाच रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी सात जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित दोन रुग्ण ४० ते ६० वर्षांदरम्यानचे होते. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा दोन लाख ९४ हजार ६७ एवढा आहे. तर, आतापर्यंत २३ लाख ७० हजार ५९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.