शहरातील नऊ समुद्र किनारे व चार नद्यांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:03 AM2019-06-05T02:03:28+5:302019-06-05T02:03:35+5:30
जल्लोष क्लिन कोस्ट्सचा उपक्रम
मुंबई : ‘जल्लोष-क्लीन कोस्ट्स’ या उपक्रमांतर्गत मुंबईतील समुद्र किनारे आणि नद्यांवर स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आला. एकाच वेळी मुंबईतील नऊ समुद्र किनारे आणि चार नद्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ), रिव्हर मार्च, बीच वॉरियर्स, माहिम बीच क्लीन अप अशा इतर संस्थांकडून उपक्रमाला पाठिंबा मिळला, तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी या उपक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
प्लॅस्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत या उपक्रमाच्या समन्वयक नीलिमा द्विवेदी म्हणाल्या की, गिरगांव चौपाटी, वरळी, दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, मढ, तसेच शहरातून वाहणाºया ४ नद्या, पोईसर, मिठी, ओशिवरा आणि दहिसर या नद्यांवर स्वच्छता राबविण्यात आली़ पर्यावरण संस्थांसोबत काम करताना वेगळाच अनुभव मिळाला. सध्या प्लॅस्टिक कचºयाची पुनर्प्रक्रिया आणि संशोधन करणे या गोष्टींवर काम करत आहोत. कचºयावर पुनर्प्रक्रिया करणे, कंपोस्टिंग व जैवविघटनक्षम करण्याचे लक्ष्य आहे. उपक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, क्लीन कोस्ट्स ड्राइव्हला कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि स्वयंसेवकांचा सहभाग होता.
गिरगांव चौपाटी, वरळी, दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, मढ, तसेच शहरातून वाहणाºया ४ नद्या, पोईसर, मिठी, ओशिवरा आणि दहिसर या नद्यांवर स्वच्छता राबविण्यात आली़