राज्यात दिवसभरात नऊ हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:19+5:302021-06-16T04:08:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात ९,३५० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात ९,३५० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १० हजारांच्या खाली असल्याचे दिसून आले आहे. सध्या राज्यात १,३८,३६१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात मंगळवारी १५,१७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५६,६९,१७९ बाधितांनी कोरोनाला हरविले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्के आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.९३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८४,१८,१३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ९,०४,४६२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ५,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.