मुंबई: भुयारी मेट्रोसाठी जुलैपर्यंत दाखल होणार नऊ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 10:17 AM2023-04-03T10:17:17+5:302023-04-03T10:17:34+5:30

मेट्रो ३ च्या २१०० प्रकल्प बाधितांचे १०० टक्के पुनर्वसन पूर्ण

Nine trains will arrive for the underground Metro Services by July in Mumbai | मुंबई: भुयारी मेट्रोसाठी जुलैपर्यंत दाखल होणार नऊ गाड्या

मुंबई: भुयारी मेट्रोसाठी जुलैपर्यंत दाखल होणार नऊ गाड्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कुलाबा - वांद्रे - सीप्झ या भुयारी मेट्रो तीनच्या कारशेडचे काम वेगाने सुरू असून, या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होत आहेत. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील ट्रेन फॅक्टरीमध्ये मेट्रो ट्रेन तयार होत असून, आता मुंबईत दाेन महिन्यांत तात्पुरती ट्रेन रिसिविंग फॅसिलिटी कार्यान्वित करण्यात आली आहे. पहिली ट्रेन मुंबईत आणली. तिच्या चाचण्या बोगद्यामध्ये सुरू झाल्या. दुसरी ट्रेनही डिसेंबरमध्ये आली. आता जुलैपर्यंत नऊ गाड्या दाखल होणार आहेत.

मेट्रो ३ च्या २१०० प्रकल्प बाधितांचे १०० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले. गिरगाव, काळबादेवी मधील ६५० हून अधिक कुटुंबांना हक्काची घरे मिळण्याच्या दृष्टीने नवीन इमारतींच्या बांधकामांची सुरुवात झाली आहे.

- २०१४ ते २०१९ दरम्यान मेट्रो प्रकल्पांनी वेग घेतला.
- एकूण ३३७ किलोमीटरची मेट्रोची कामे होत आहेत.
- एकूण १४ लाइन्स.
- २२५ हून अधिक स्थानके.
- २०३१ पर्यंत एक कोटी प्रवासी प्रवास करतील.

  • मेट्रो २ ब    ३६.२३%
  • मेट्रो ४    ४७.८७%
  • मेट्रो ४ अ    ४८.३५%
  • मेट्रो ५    ७२.२५%
  • मेट्रो ६    ६७.५०%
  • मेट्रो ७ अ    ११.७६%
  • मेट्रो ९    ४५.३०%


कामाचा वेग

८०% प्रकल्पाचे एकंदर काम पूर्ण.
८५% आरेपासून बीकेसीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण. 
१००% टनेलिंग पूर्ण. 
९७% पहिल्या टप्प्यातील स्टेशनची कामे पूर्ण.
६६% प्रणालीचे तर ट्रॅकचे ७४ टक्के काम पूर्ण. 

Web Title: Nine trains will arrive for the underground Metro Services by July in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.