कोरोनाचे ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 07:29 AM2021-09-07T07:29:20+5:302021-09-07T07:29:39+5:30

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत घट

Ninety percent of corona patients are in just ten districts pdc | कोरोनाचे ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांत

कोरोनाचे ९० टक्के रुग्ण फक्त दहा जिल्ह्यांत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यापैकी ९० टक्के रुग्ण दहा जिल्ह्यात सामावलेले आहेत. त्यातही पुणे, ठाणे, सातारा, अहमदनगर आणि मुंबई या पाच जिल्ह्यात ७२.५% रुग्ण आहेत. सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील रुग्णांची एकूण टक्केवारी १७.७७% आहे.

राज्यात सध्या दर दिवशी १३०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. त्यापैकी ४०० मेट्रिक टन हॉस्पिटलसाठी व जवळपास ६०० मेट्रिक टन उद्योग व इतर कामासाठी वापरला जात आहे. ऑक्सिजनचे १३० छोटे प्लांट्स हॉस्पिटल्समध्ये कार्यान्वित असून त्यातून ११० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत ५०० छोटे प्लांट्स ऑक्सिजन निर्मितीचे काम सुरू करतील. तेव्हा आणखी ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल.
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन मृत्युसंख्येत घट
nराज्यात सोमवारी दैनंदिन मृत्यूंच्या संख्येत घट झाल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात ३ हजार ६२६ रुग्ण आणि ३७ मृत्यू झाले आहेत. सक्रिय 
रुग्णसंख्येतही घसरण झाली असून, ही संख्या ५० हजारांखाली आली आहे. 
nसध्या राज्यात ४७ हजार ६९५ रुग्ण उपचाराधिन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात दिवसभरात ५ हजार ९८८ रुग्णांनी कोविडवर मात केली, तर आतापर्यंत ६३ लाख ७५५ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. 

टॉप फाइव्ह
पुणे २९.७३%
ठाणे १३.७८%
सातारा ११.८७%
अहमदनगर ९.७१%
मुंबई ७.७५%
बेस्ट फाइव्ह जिल्हे
धुळे ०, नंदुरबार १, वर्धा ३, वाशीम ४, भंडारा ४
 

Web Title: Ninety percent of corona patients are in just ten districts pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.