राज्यात सलग नवव्या दिवशी दैनंदिन रुग्ण पाच हजारांच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:05+5:302020-12-15T04:24:05+5:30
राज्यातील आकडेवारी : काेराेनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत काहीशी वाढ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचे संक्रमण कमी होते ...
राज्यातील आकडेवारी : काेराेनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत काहीशी वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचे संक्रमण कमी होते आहे. सलग नवव्या दिवशी राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे सक्रिय रुग्णांच्या संख्येत मात्र काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मागील आठवड्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७१ हजार ९१० होती, यात वाढ होऊन रविवारी ती ७४ हजार १०४ वर पोहोचली आहे. मुंबईतही गुरुवार ९ डिसेंबर रोजी ११ हजार ८८६ सक्रिय रुग्ण होते, यात वाढ होऊन रविवारी ही संख्या १३ हजार ११२ वर पोहोचली. राज्यात मागील काही आठवड्यांपासून पॉझिटिव्हिटी दर हा ६-७ टक्क्यांदरम्यान आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात पॉझिटिव्हिटी दर हा १७ टक्क्यांच्या जवळपास होता. मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी दरही कमी होत आहे.
* कालावधी व दैनंदिन रुग्णसंख्या
१३ डिसेंबर ३७१७, १२ डिसेंबर ४२५९, ११ डिसेंबर ४२६८, १० डिसेंबर ३८२४, ९ डिसेंबर ४९८१.