जगातले नववे आश्चर्य मुंबईत; रेल्वे; एमआरआयडीसीचा नवा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:25 AM2024-04-09T11:25:55+5:302024-04-09T11:26:13+5:30

गाेखले पुलाच्या आविष्कारानंतर रेल्वे; एमआरआयडीसीचा नवा चमत्कार

Ninth wonder of the world in Mumbai; railway; The new miracle of MRIDC | जगातले नववे आश्चर्य मुंबईत; रेल्वे; एमआरआयडीसीचा नवा चमत्कार

जगातले नववे आश्चर्य मुंबईत; रेल्वे; एमआरआयडीसीचा नवा चमत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  जगात सात आश्चर्य आहेत. आठवे आश्चर्य गाेखले पुलाचे घडले. त्या पाठाेपाठ आत अभियांत्रिकीचा आणखी एक अनाेखा आविष्कार मुंबईत घडला आहे. दादर येथील टिळक पुलाचे बांधकाम करताना रेल्वे आणि एमआरआयडीसी या दोन यंत्रणांनी पुलाच्या एका पिलरचा स्पॅम लगतच्या ८९ वर्षे जुन्या विष्णू निवास इमारतीला खेटून उभा केला आहे.

आमच्या घरातच हा स्पॅम उतरवा म्हणजे पुलावर जाणे साेपे हाेईल, अशी मागणी तिथल्या रहिवाश्यांनी केली तर ती पूर्ण करणे आता अडचणीचे हाेणार नाही, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. 

अंधेरीत  नव्याने बांधण्यात आलेला  गोखले पूल आणि बर्फीवाला पूल या दोन्ही पुलांच्या  उंचीत तफावत निर्माण झाल्यामुळे मुंबई पालिकेची किर्ती जगभर गेली.  ही  तफावत दूर करण्यासाठी पालिका जंग जंग पछाडत आहे. त्यासाठी नेमण्यात आलेल्या आयआयटीच्या तज्ज्ञांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. मात्र, त्या उपाययोजना करणे हेही सहजसोपे काम नाही. त्यातच आता टिळक पुलाचा स्पॅम थेट घराच्या खिडकीपर्यंत भिडवल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) आणि मुंबई महापालिका करत आहे. जुना पूल हा १९२५ साली बांधण्यात आला असून, या पुलाला समांतर नवा पूल बांधला जात आहे. नवा पूल तयार झाल्यानंतरच जुना पूल पाडला जाईल. नवा  पूल हा केबलवरील तंत्रज्ञानावर आधारित आहे. पूल उभारणीसाठी पालिकेने निधी  दिला आहे.एकप्रकारे इमारतीतून सहजपणे त्या स्पॅमवर  उतरता येईल अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते झोरू बथेना यांनी या प्रकाराकडे लक्ष वेधले आहे.

मंजुरीप्रमाणे काम
nपालिकेने आम्हाला ज्या मंजुऱ्या दिल्या, त्याप्रमाणे आम्ही बांधकाम केले. पुलाच्या लगतची इमारत ही  पालिकेच्या अधिकार क्षेत्रातील आहे, असे ‘एमआरआयडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती बथेना यांनी दिली. 
nयासंदर्भात पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य इंजिनीअर विवेक कल्याणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.  

Web Title: Ninth wonder of the world in Mumbai; railway; The new miracle of MRIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.