निरूपम फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात - नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:40 AM2017-10-30T05:40:38+5:302017-10-30T05:40:55+5:30

फेरीवाल्यांकडून संजय निरूपम यांना हप्ता मिळतो. त्यावर त्यांचे घर चालते, म्हणूनच त्यांना फेरीवाल्यांचा इतका पुळका आलेला आहे.

 Nirupam takes the installments from the hawkers - Nitesh Rane | निरूपम फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात - नितेश राणे

निरूपम फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात - नितेश राणे

Next

मुंबई : फेरीवाल्यांकडून संजय निरूपम यांना हप्ता मिळतो. त्यावर त्यांचे घर चालते, म्हणूनच त्यांना फेरीवाल्यांचा इतका पुळका आलेला आहे. सर्वधर्मसमभावाची काँग्रेसची शिकवण निरूपम यांना बहुतेक मान्य नसावी. त्यांनी मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय मंच करून टाकले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी रविवारी केली.
फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मनसे विभागाध्यक्ष सुशांत माळवदे यांची नितेश राणे यांनी कांदिवलीच्या आॅस्कर रुग्णालयात भेट घेतली. यानंतर, माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, मराठी माणूस म्हणून मी आज इथे आलो आहे.
एखादा अनधिकृत फेरीवाला मराठी माणसाला मारहाण करतो, ही बाब खपवून घेतली जाणार नाही. अन्य भाषिक गट त्यांच्यावर हल्ले झाल्यावर एकत्र येतात. मराठी माणसावरील या हल्ल्यानंतर मराठी म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.
संजय निरूपम यांची चिथावणीखोर भाषा काँग्रेसच्या शिकवणीत बसत नाही. त्यांनी मुंबई काँग्रेसला उत्तर भारतीय मंच बनवून टाकले आहे. मुंबई काँग्रेस पक्ष हा दिवसेंदिवस उत्तर भारतीयांचा पक्ष बनत चालला आहे. काँग्रेसला मराठी माणसाची मते चालतात; पण मराठी माणूस चालत नाही, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादंगाबाबत शिवसेनेने अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नाही. याबाबत विचारले असता राणे म्हणाले की, मराठी माणसाचा कैवार घेणारी शिवसेना बाळासाहेबांसोबतच संपली.
आता फक्त इनकमिंगवाली शिवसेना आहे. जिथून इनकमिंग असते, तिथे हे सलाम ठोकतात, म्हणूनच मुंबईत शिवसेनेची पिछेहाट होत आहे, असा टोला राणे यांनी लगावला.

Web Title:  Nirupam takes the installments from the hawkers - Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.