नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले, महागाईचा कळस - गुरुदास कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 05:36 AM2017-12-31T05:36:05+5:302017-12-31T05:36:13+5:30

मोदी सरकारने नोटाबंदी लादून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. महागाईने तर कळस गाठला असून जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक व गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे, अशी टीका माजी खासदार गुरुदास कामत यांनी शनिवारी केली़

 Nirvana breaks the comprehension of ordinary citizens, the climax of inflation - Gurudas Kamat | नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले, महागाईचा कळस - गुरुदास कामत

नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले, महागाईचा कळस - गुरुदास कामत

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर
मुंबई : मोदी सरकारने नोटाबंदी लादून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. महागाईने तर कळस गाठला असून जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक व गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे, अशी टीका माजी खासदार गुरुदास कामत यांनी शनिवारी केली़
आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा अवधी असला तरी गेल्या दीड महिन्यापासूनच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार कामत यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. ते येथूनच लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत़
मुंबई काँग्रेसतर्फे नववर्षात ६ जानेवारीपासून मोदी सरकारच्या ध्येयधोरणांविरोधात जनआक्रोश सभांचे आयोजन मुंबईतील उर्वरित ५ लोकसभा मतदारसंघांत करण्यात येणार आहे. मात्र उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कामत यांनी या जनआक्रोश सभांच्या आयोजनात आघाडी घेतली आहे. १५ ते ३० डिसेंबरपर्यंत त्यांनी अंधेरी पश्चिम, वर्सोवा, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव या ५ विधानसभा क्षेत्रांत सभा झाल्या. शनिवारी सायंकाळी दिंडोशी विधानसभा क्षेत्रात मालाड पूर्व आप्पा पाडा येथील आयोजित जनआक्रोश सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल चढवताना कामत म्हणाले, ‘अच्छे दिन येणार असे गाजर देशासह मुंबईतील मतदारांना दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशातील १२० कोटी जनतेची घोर निराशा केली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये ४१ प्रचारसभा मोदी यांनी घेतल्या तरी मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली.’
मोदी सरकारने लादलेल्या जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्रासह अनेक उद्योगधंदे बंद पडून देशातील कामगारवर्गदेखील मोठ्या प्रमाणात बेकार झाला. तर देशातील काळा पैसा बाहेर काढू अशी वल्गना करून नोटाबंदी लादून सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. महागाईने तर कळस गाठला असून जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक व गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारची अच्छे दिनाची वल्गना ही बोलाची कढी व बोलाचा भात होता, अशी टीका गुरुदास कामत यांनी केली.
ते म्हणाले, राज्य सरकारने अलीकडेच ३ लाख कर्मचारी कपात करणार असा निर्णय घेतल्यामुळे सरकारमध्ये काम करणाºया ३ लाख मराठी बांधवांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे. त्याविरोधात मराठीचा पुळका घेणाºया शिवसेनेचे सत्तेत असलेले मंत्री गप्प बसले आहेत़
 

Web Title:  Nirvana breaks the comprehension of ordinary citizens, the climax of inflation - Gurudas Kamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.