निशिकांतनं दशकाचा 'कल्ट' सिनेमा दिला, राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 09:27 AM2020-08-18T09:27:21+5:302020-08-18T09:29:14+5:30

निशिकांत कामत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती, त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता.

Nishikant kamat gave the movie 'Cult' of the decade, Raj Thackeray evoked memories | निशिकांतनं दशकाचा 'कल्ट' सिनेमा दिला, राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

निशिकांतनं दशकाचा 'कल्ट' सिनेमा दिला, राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

Next
ठळक मुद्देनिशिकांत कामत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती, त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता.

मुंबई - 'दृश्यम' आणि 'डोंबिवली फास्ट' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाची अफवा सकाळपासून सगळीकडे पसरली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याचे रितेश देशमुखने ट्विटरवर सांगितले होते. मात्र, सोमवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. निशिकांत कामत यांनी वयाच्या 50व्या वर्षी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. निशिकांत यांच्या निधनानंतर बॉलिवूडसह मराठी चित्रपट क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निशिकांत यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट लिहित आदरांजली वाहिली. 

निशिकांत कामत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती, त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होत होता. सोमवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. निशिकांत कामत यांच्या निधनाच्या वृत्तावर कलाविश्वातील कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. तर, राजकीय दिग्गजांनीही निशिकांत यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केलंय. 

निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. चित्रपट माध्यमावर प्रेम करणारा उमदा, संवेदनशील अभिनेता आणि गुणी दिग्दर्शक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे छोटासा लेख लिहून निशिकांतच्या आठवणी जागवल्या. प्रत्येक दशकाचा एक कल्ट सिनेमा असतो, निशिकांतने डोंबिवली फास्ट हा कल्ट सिनेमा चित्रपटसृष्टीला दिल्याचं राज यांनी म्हटलंय. 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष, अमेय खोपकर यांनीही ट्विटरवर लिहिले की, अजून ‘लय भारी’ काम करायचं होतं मित्रा... तुझ्याइतका शांतचित्त दिग्दर्शक मी तरी अजून पाहिलेला नाही. आता तर अगदीच शांत झालास... अजून काय लिहू? तू तर मनातलं ओळखायचास आणि गूढ हसायचास... तसाच गूढपणे गूढ देशी निघून गेलास तुझी आठवण सतत येत राहणार दोस्ता...

दरम्यान रितेश देशमुखने ट्विटरवर निशिकांत कामतसोबत गळाभेट करतानाचा फोटो शेअर करत ट्विट केले. त्यांनी म्हटले की, मित्रा तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो.

निशिकांत कामत यांनी 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील 'मुंबई मेरी जान' या चित्रपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामत यांनी 'दृश्यम', 'मदारी', 'फुगे' यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. याशिवाय, 'सातच्या आत घरात', 'रॉकी हॅण्डसम', 'जुली 2', 'मदारी', 'भावेश जोशी' या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामत यांनी अभिनय केला.
 

Web Title: Nishikant kamat gave the movie 'Cult' of the decade, Raj Thackeray evoked memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.