Nitesh Rane: मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू?, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:53 PM2021-07-24T12:53:57+5:302021-07-24T12:55:22+5:30

Nitesh Rane: राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवरुन भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Nitesh Rane allegation cm uddhav thackeray over black magic | Nitesh Rane: मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू?, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

Nitesh Rane: मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू?, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

googlenewsNext

Nitesh Rane: राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवरुन भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू चालत असल्याचं आम्ही ऐकतोय, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. 

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. यात महाडमधील तळीये गावात सर्वात मोठी दुर्घटना घडली असून यात आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एकूण ८५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यावरील संकटावरुन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी एक ट्विट केलं असून यात खळबळजनक आरोप देखील केला आहे. 

"स्वत:चे मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वत:च्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो...तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरुन २८ नोव्हेंबर २०१९ ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल!!", असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे आज महाडमधील तळीये गावात दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत. दुपारी दीड वाजताच्या सुमारात ते तळीये गावात पोहोचणार आहेत. तळीये गावातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना राज्य सरकारनं प्रत्येकी ५ लाखांची तर केंद्र सरकारकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. 

Web Title: Nitesh Rane allegation cm uddhav thackeray over black magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.