मुंबई: मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख ‘भावी सहकारी’ असा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेलाही उधाण आले. यानंतर महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपमधील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. यानंतर आरोप-प्रत्यारोपही झाले. यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी यामागे एक वेगळाच डाव असल्याचे अजब तर्क लावला आहे. (nitesh rane claims cm uddhav thackeray statement only to divert media attention from bridge collapse in BKC)
“म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भावी सहकारी’ असा शब्दप्रयोग केला”: संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते शुक्रवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात अनेकांना संभ्रमात टाकणारी ठरली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिशेने पाहत, मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी, असे म्हटले. यानंतर अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. मात्र, भाजप आमदार नितेश राणे यांनी यावरून एक वेगळाच दावा केला आहे. एक ट्विट करत शंका उपस्थित केली आहे.
“चंद्रकांत पाटील तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय”: CM उद्धव ठाकरे
CM उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव!
या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. शुक्रवारी पहाटे मुंबईतील बीकेसी परिसरात निर्माणाधीन असलेल्या एका उड्डाणपुलाचा गर्डर कोसळून दुर्घटना घडली होती. यामध्ये अनेक मजूर जखमी झाले. या दुर्घटनेवरून प्रसारमाध्यमांचे लक्ष हटवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीची आशा दाखवणारे वक्तव्य केले का, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याकडे लक्ष लागले आहेत.
“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट'
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने वांद्रे पूर्वेकडील बीकेसीमधील एमटीएनएल जंक्शन येथे हाती घेण्यात आलेल्या पुलाच्या कामाचा काही भाग शुक्रवारी पहाटे ४ वाजता कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ कामगार जखमी झाले. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचे काम सुरू असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली. पूल पडायला सुरुवात झाल्यानंतर काही मजूरांना त्याचा अंदाज झाला. त्यामुळे या मजूरांनी पूलावरुन वेळीच पळ काढला. मात्र, काही जण यामध्ये जखमी झाले.