Join us

Nitesh Rane: 10 मिनिटं पोलिसांना बाजुला करा, नितेश राणेंचा अकबरुद्दीन औवेसींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 3:39 PM

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली

मुंबई - एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी देखील अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. आता, भाजप आमदार नितेश राणे यांनीही या भेटीवरुन अकबरुद्दीन ओवेसींनी थेट इशारा देत राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. 

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली. माझा एक खासदार आहे, तू तर बेघर आहे. मी तुला काय उत्तर देऊ, अशा शब्दात राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. तत्पूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिल्यामुळे ओवेसींवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी ओवेसींनी लक्ष्य केल्यानंतर आता, नितेश राणे यांनीही टिका केली आहे. 

या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण, राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे'', याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व !, अशा प्रखर शब्दात नितेश राणेंनी राज्य सरकारवर जहरी टिका केली आहे. तसेच, मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर...आम्ही शिवरायांचे मावळे नाही !, असा इशाराही राणेंनी ट्विटरवरुन दिला आहे. 

मनसेच्या दिलीप धोत्रेंचाही कडक शब्दात इशारा

दिलीप धोत्रे यांनी ओवेसींना अत्यंत कडक आणि खालच्या भाषेत उत्तर दिले आहे. ज्या संभाजीराजेंना आम्ही दैवत मानतो, त्यांचे हाल करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून अकबरुद्दीन ओवेसी याने आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता, त्याचे थडगे देखील औरंगजेबाच्या थडग्या शेजारी बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. तसेच अकबरुद्दीन ओवेसी याच्या अंगात पाकिस्तानाच रक्त असल्याची टीका देखील धोत्रे यांनी केली आहे. 

जलील यांचं स्पष्टीकरण

इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, दरगाहवर जाणे आणि तेथे जाऊन ‘दरूद शरीफ’ पडणे ही आमची संस्कृती आहे. ओवेसी यांनी जाणीवपूर्वक औरंगजेब यांच्याच कबरीवर पुष्प अर्पण केले नाही, तर या भागातील विविध थोर सुफींच्या दरगाहमध्ये जाऊन चादर-पुष्प अर्पण केले. कोणतेही कारण नसताना विरोधकांकडून वाद उकरून काढण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :नीतेश राणे औरंगाबादपोलिसमुंबई