Nitesh Rane : 'तुम्ही कोकणचे राजे आहात, मग तुमचा मुलगा पळपुट्या का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 08:17 PM2021-12-30T20:17:50+5:302021-12-30T20:38:34+5:30

महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती,

Nitesh Rane : 'You are the king of Konkan, so why did your son run away?', gulabrao patil on narayan rane | Nitesh Rane : 'तुम्ही कोकणचे राजे आहात, मग तुमचा मुलगा पळपुट्या का?'

Nitesh Rane : 'तुम्ही कोकणचे राजे आहात, मग तुमचा मुलगा पळपुट्या का?'

Next
ठळक मुद्देनारायण राणेंना जे काही मिळालं ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच मिळालं. जिसके घर मे खाना, उसीमे छेद करना, असं काम त्यांनी केलंय. ते जर एवढे बहाद्दर आहेत

सिंधुदुर्ग/मुंबई - सिंधुदुर्गातील शिवसेनेचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. राणे आणि शिवसेना वादावर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती,यातील मुख्य सूत्रधार हा सचिन सातपुते असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या वरूनच पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांच्या अटकेची तयारी केली. तत्पूर्वी त्याची नोटीस देऊन चौकशी ही करण्यात आली होती. सध्या नितेश राणे फरार आहेत. त्यावरुन गुलाबराव पाटील यांनी नितेश राणेंना पळपुट्या म्हटलं आहे. 

''नारायण राणेंना जे काही मिळालं ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच मिळालं. जिसके घर मे खाना, उसीमे छेद करना, असं काम त्यांनी केलंय. ते जर एवढे बहाद्दर आहेत, तर मुलगा पळपुट्या का आहे?. तुम्ही कोकणचे राजे आहात ना, मग आपला छोटो राजा कुठे आहे?,'' असा थेट सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे. दरम्यान, सरकार बरखास्त करणं हे काही छोटी गोष्ट नाही, ते कटपुतलीचं काम नाही. विरोधी पक्षाचं कामच आहे, ताकीद देण्याचं. पण, ताकीद समजून घेण्याचं काम सरकारचं आहे,'' असेही पाटील यांनी म्हटलं. 

जामीन अर्ज फेटाळला

आमदार राणे यांनी पोलीस कारवाई पूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू होती मात्र यावर निर्णय झाला नव्हता आज यावर अंतिम निकाल देण्याचे न्यायालयाने बुधवारी सांगितले होते. सकाळपासूनच काय निकाल न्यायालय देईल याची उत्सुकता शिगेला ताणली होती. संध्याकाळी उशिरा त्याबाबतचा निर्णय आला असून यात आमदार नितेश राणे यांना दणका दिला असून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
 

Web Title: Nitesh Rane : 'You are the king of Konkan, so why did your son run away?', gulabrao patil on narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.