गणपती बाप्पा मोरया... नारायण राणेंच्या मंत्रीपदाचं कोकणवासीयांना मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 12:44 PM2021-08-22T12:44:41+5:302021-08-22T12:46:54+5:30

एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते.

Nitesh Rane's big announcement for Ganeshotsav, Narayan Rane's ministerial post as a gift to the people of Konkan | गणपती बाप्पा मोरया... नारायण राणेंच्या मंत्रीपदाचं कोकणवासीयांना मोठं गिफ्ट

गणपती बाप्पा मोरया... नारायण राणेंच्या मंत्रीपदाचं कोकणवासीयांना मोठं गिफ्ट

googlenewsNext
ठळक मुद्देदरवर्षी गणेशोत्सवावेळी कोकणवासीयांसाठी आपल्याकडून बसेस सोडण्यात येतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे, यंदा बसेसऐवजी विशेष ट्रेन कोकणवासीयांसाठी सोडण्यात येणार आहे.

मुंबई - गणपती उत्सव म्हणजे मराठीजनांच्या एकतेचं अन् उत्साही उत्सावाचं प्रतिक होय. गल्लीबोळात उभारणारे मंडप ते मुंबईच्या लालबागच्या राजाचा थाट हे गणेशोत्सवाचं आकर्षण असतं. त्यासोबतच, कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा हा सण आहे. दरवर्षी मुंबईत स्थिरावलेले कोकणवासी गणेशोत्ववासाठी आपल्या गावी जातात. यंदाही ते गावी जाणार आहेत, त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा बस धावणार आहेत. त्याहीपेक्षा आनंदाची बातमी म्हणजे केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळाल्याने आमदार नितेश राणेंनी कोकणवासीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

दरवर्षी गणेशोत्सवावेळी कोकणवासीयांसाठी आपल्याकडून बसेस सोडण्यात येतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे, यंदा बसेसऐवजी विशेष ट्रेन कोकणवासीयांसाठी सोडण्यात येणार आहे. मोदी एक्सप्रेस या नावाने ही ट्रेन मुंबईतून सुटणार असून कोकणातील कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे घेऊन जाणार आहे. दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 8 वरुन ही ट्रेन सुटणार आहे. या प्रवासादरम्यान, कोकणवासीयांना 1 वेळचं जेवणही देण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये 1800 नागरिक, प्रवासी बसण्याची क्षमता आहे. या प्रवासासाठी संबंधितांशी संपर्क करण्याचं आवाहनही नितेश राणे यांनी केलं आहे. 27 ऑगस्टपर्यंत सबंधितांना फोन करुन आपली सीट रिझर्व्ह करा, असे आवाहनही राणेंनी केले आहे. त्यामुळे, कोकणवासीयांचा मोफत प्रवास होणार असून आता गावची आणि गणेशोत्सवाची ओढ सर्वांनाच लागली आहे. 

महामंडळाने जादा बसेसही सोडल्या

दरम्यान, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे 2200 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, गणेशोत्सवासाठी 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2021 दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील.
 

Web Title: Nitesh Rane's big announcement for Ganeshotsav, Narayan Rane's ministerial post as a gift to the people of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.