Join us  

ND स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा डोळा होता, म्हणून..; भाजपा आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 3:12 PM

ठाकरे सिनेमाचे काही शुटींग एनडी स्टुडिओमध्ये केले होते. त्याचे पैसे दिले होते का? अजूनपर्यंत त्या शुटींगचा चेक दिला होता का याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यायला हवे असं त्यांनी सांगितले.

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंची जीभ घसरली असं एका मीडियाने म्हटलं नाही. आता उबाठा अंगावर आलंय ते शिंगावर घेऊ. आता जे जे बाहेर येईल त्यावर घरात बसून लपायचं नाही. कालपासून नितीन देसाईंबाबत जो अग्रलेख लिहिला, त्यांच्यावर अन्याय झाला असे बोलले गेले. नितीन देसाई मेहनती माणूस होता. माझे वैयक्तिक त्यांच्याशी फार चांगले संबंध होते. नितीन देसाई यांच्यावर एनडी स्टुडिओ आम्हाला विकत द्यावा यासाठी उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांचा दबाव होता असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले की,  नितीन देसाईंवर जोरजबरदस्ती केली होती. दबाव होता. एनडी स्टुडिओ आम्हाला विका यासाठी धमक्या मातोश्रीची निगडीत माणसाने दिल्या होत्या. आम्हाला कोणाच्या मृत्यूवर राजकारण करायचे नाही. आमचे थोबाड उघडायला लावले तर तुमच्या मालकाचे वस्त्रहरण करणार असं मी राऊतांना सांगितले होते. एनडी स्टुडीओ घेण्यासाठी नितीन देसाईंचा मानसिक छळ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी केला. ठाकरे सिनेमाचे काही शुटींग एनडी स्टुडिओमध्ये केले होते. त्याचे पैसे दिले होते का? अजूनपर्यंत त्या शुटींगचा चेक दिला होता का याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यायला हवे असं त्यांनी सांगितले.

तसेच नितीन देसाईंवर दबाव का आणला गेला? सत्ता असताना आदित्य ठाकरेंनी मराठी कलाकारांना मोठे का केले नाही. महाविकास आघाडी असताना दिनो मोरियाला बीएमसीचे अर्धे कंत्राट दिले जायचे. तेव्हा नितीन देसाई आणि मराठी कलाकार आठवले नाही का?. संध्याकाळी साडेसात नंतर दिनो मोरिया लागतो मग सत्ता गेल्यानंतर नितीन देसाईं आठवतात असा टोलाही नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावला.

दरम्यान, आता वडिलांचे प्रेम आलंय पण बाळासाहेब ठाकरेंना हयात असताना उद्धव ठाकरे कुटुंबीय त्यांना म्हातारा म्हणून हाक मारायचे. बाळासाहेब जे रुद्राक्ष माळ घालायचे ती माळ कचऱ्याच्या डब्यात फेकून टाकली. आम्हीदेखील तुमचे वस्त्रहरण करू शकतो. कंगना, नवनीत राणा यांच्याकडून राखी बांधून दाखवावी. उद्धव ठाकरेंचे राजकीय धर्मांतरण झाले आहे. हिंदुत्वासोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. नितीन देसाई मातोश्रीवर भेटायला गेले तेव्हा त्यांना भेटही दिली नाही. लंडनची सुट्टी कुठल्या गुजराती व्यापाऱ्याच्या पैशावर केली ते जाहीर करा. इंडिया आघाडीच्या बैठकीला कुणी पैसे खर्च केलेत ते आम्ही जाहीर करू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

टॅग्स :नीतेश राणे उद्धव ठाकरेनितीन चंद्रकांत देसाईसंजय राऊत