Join us

नितीन आगे खून खटला मुंबईत नव्याने चालवावा, तपासही पुन्हा करा, हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 3:11 AM

नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करणारा अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, नव्याने तपास करून खटला मुंबईतील सत्र न्यायालयात चालविला जावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

मुंबई : नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करणारा अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, नव्याने तपास करून खटला मुंबईतील सत्र न्यायालयात चालविला जावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी, अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. याचिकेवर लवकरच प्राथमिक सुनावणी अपेक्षित आहे. सरकारी वकील, साक्षीदारांना संरक्षण द्यावे, नितीन ज्या कॉलेजमध्ये शिकत होता, त्या कॉलेज ट्रस्टींना, मुख्याध्यापकांना सहआरोपी करावे, अशी विनंतीही याचिकेत आहे. जामखेडचा नितीन आगे हा १२ वीतील विद्यार्थी होता. उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला.९ आरोपींची सुटकासरकारी वकिलांनी २६ जणांना साक्षीदार केले. मात्र, त्यापैकी १३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे अहमदनगर सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी ९ आरोपींची सुटका केली.

टॅग्स :न्यायालय