नितीन गडकरींचा शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांना वाकून नमस्कार; जोशी सरांची घेतली सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:48 PM2021-01-07T12:48:56+5:302021-01-07T12:50:14+5:30

नितीन गडकरी यांनी जोशी सरांना वाकून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले.

nitin Gadkari bows to former Shiv Sena chief minister manohar joshi | नितीन गडकरींचा शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांना वाकून नमस्कार; जोशी सरांची घेतली सदिच्छा भेट

नितीन गडकरींचा शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांना वाकून नमस्कार; जोशी सरांची घेतली सदिच्छा भेट

Next

मुंबई
भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या विस्तव जात नसला तरी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे ऋृणानुबंध कायम असल्याचं एका भेटीनं दिसून आलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची मुंबईत भेट घेतली. 

मुंबईत मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन नितीन गडकरींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नितीन गडकरी यांनी जोशी सरांना वाकून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. नितीन गडकरींच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. 

मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विकासामध्ये नितीन गडकरी यांचा महत्वाचा वाटा होता. 

Web Title: nitin Gadkari bows to former Shiv Sena chief minister manohar joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.