भू संपादन विधेयकासाठी सर्वपक्षीयांना भेटणार - नितिन गडकरी
By admin | Published: February 27, 2015 04:37 PM2015-02-27T16:37:02+5:302015-02-27T16:37:02+5:30
भू संपादन विधेयक पारित करण्यासाठी आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह सर्व पक्षीयांची लवकरच भेट घेणार असल्याचे नितिन गडकरी यांनी सांगितले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - भू संपादन विधेयक हे शेतक-यांच्या विरोधात नसून ते शेतक-यांच्या हिताचे असल्याचे सांगत भू संपादन विधेयक पारित करण्यासाठी आपण सर्वपक्षीयांना भेटणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले.
८० टक्के भू संपादन हे सिंचनाखाली असल्याचे सांगून देशात सर्वात कमी प्रमाणात सिंचन झालेल्यांमध्ये महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह सर्व पक्षीयांची लवकरच भेट घेणार असल्याचे नितिन गडकरी यांनी सांगितले. भाजप सरकारने आत्तापर्यंत ३ हजार कोटी रुपयांचा मोबदला शेतक-यांना दिला आहे असे सांगून हे विधेयक शेतक-यांच्या फायद्याचे असल्याचा पुनरुच्चार गडकरी यांनी केला.