Nitin Gadkari Meets Raj Thackeray : नितीन गडकरी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; २० मिनिटे झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 11:49 PM2022-04-03T23:49:18+5:302022-04-03T23:49:44+5:30
शनिवारी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार निशाणा साधल्यानंतर रविवारी गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसंच अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपलं परखड मतही मांडलं. अनेकांनी यानंतर राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अशातच गुढी पाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि गडकरी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शनिवारी झालेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर अनेक भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागतही केलं होतं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल २० मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात भाजप आणि मनसे यांची युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यापासून मोहित कंबोज यांच्यापर्यंत भाजपच्या सर्वच राजकीय नेत्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचं समर्थन केलं. प्रविण दरेकर यांनीदेखील राज ठाकरे यांचं भाषण हे सर्वस्पर्शी आणि भविष्याचा वेध घेणारं होतं असं म्हटलं होतं.
काय म्हणाले होते दरेकर ?
भारतीय जनता पक्षाची विचारधारा, हिंदुत्वाची भूमिका, महाराष्ट्र मागे चाललाय यासंदर्भातील भूमिका अशी मिळती जुळती भूमिका भाजपचीही आहे. येणाऱ्या काळात काय होईल हे माहित नाही. परंतु निश्चितच त्यांची भूमिका भाजपच्या विचारधारेला सुसंगत आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चिंता करणारी आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेवर टीका केली. आमच्या दृष्टीनं त्यांच्या भूमिका स्वागतार्ह आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं चांगल्या वाटत असल्याचंही ते म्हणाले होते.