Join us

गडकरींनी पंतप्रधान मोदींकडून 'हेल्थटीप्स' घ्याव्यात, संजय राऊतांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:54 PM

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला आहे. नितीन गडकरी त्यांची ...

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला आहे. नितीन गडकरी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी. मात्र, गडकरी यांनी हेल्थबाबत पंतप्रधानांकडून टिप्स घ्याव्यात. पंतप्रधान जगभर फिरूनदेखील त्यांची तब्येत खराब होत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.  

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने त्यांना भोवळ आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

गडकरींच्या प्रकृतीबाबत बोलताना, राऊत यांनी मोदींना टोला लगावला. तसेच गडकरींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही केली. तसेच राऊत यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेना स्वबळाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेनेसोबत भाजपा युतीसाठी आग्रही आहे. पण, 2014 साली भाजपाची युतीची इच्छा कुठे दबली होती ?, 2014 साली तोडलेली युती 2019 साली का करावी वाटते, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि उद्धव भेट ठाकरेंची भेट याचा युतीशी संबंध नाही. भाजपाचा कार्यक्रम आहे म्हणून जायचं नाही, ही शिवसेनीची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. 

संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे : - -  भाजपाची युतीची इच्छा 2014 साठी कुठे दाबली गेली होती.-  गिरीष महाजनानी मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस यांची आरती ओवाळन बंद करून जनतेचे प्रश्न सोडवावे. त्यांच्या जामनेर मतदार संघात दोन दिवसाआड पाणी येते.- मुख्यमंत्र्यांकडे जादू असून ते चमत्कारी आहेत, या गिरीष महाजनांच्या वक्तव्याविरोधात अंनिसला तक्रार दाखल करायची संधी. त्यामुळे अंनिसने या वक्तव्यचा अभ्यास करावा.-मुख्यमंत्र्यांकडे चमत्कार असेल तर त्यांनी राज्यातील दुष्काळासारखे प्रश्न या चमत्काराने सोडवावेत. राम शिंदे यांना मतदार 2019 ला पाहुण्यांकडे ठेवतीलकेंद्रीय पथकाला z + सुरक्षा घेऊन फिरण्याची वेळ आली आहे, त्यांना हल्ल्याची भीती का ?- हिरे कुटुंब अनेकांच्या संपर्क तसं माझाही संपर्कात होतं, ते आता राष्ट्रवादीत गेले उद्या कुठे जातील हे सांगू शकत नाही.

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतनितीन गडकरीनरेंद्र मोदी