मुंबई : जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. बिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकलेले बिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकपणे कोणाचीही जोडणी कापली जाणार नाही, अशी ग्वाही ऊजामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी दिली.लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक झाली. बैठकीला राऊत उपस्थित होते. सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या विजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावीआणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. राऊतयांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच ग्राहकांना विजेचे बिल कशाप्रकारे देण्यात आलेयाबाबतची माहिती देण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले.यंत्रणा निर्माण करावीयावेळी परिवहन मंत्री परब यांनी, बिलाबाबतच्या तक्रारींचे शंभर टक्के निरसन करावे, कोणाही ग्राहकाला चुकीचे बिल भरायला लागू नये याची दक्षता वीज वितरण कंपन्यांनी घ्यावी; तक्रारींबाबत जलद प्रतिसाद पद्धतीने कार्यवाहीची यंत्रणा निर्माण करावी आदी सूचना केल्या.
वीजबिलाच्या प्रत्येक तक्रारीची करणार तपासणीमुंबई : जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. बिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकलेले बिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकपणे कोणाचीही जोडणी कापली जाणार नाही, अशी ग्वाही ऊजामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी दिली.लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्यावाढीव बिलांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक झाली. बैठकीला राऊत उपस्थित होते. सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या विजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावीआणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. राऊतयांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच ग्राहकांना विजेचे बिल कशाप्रकारे देण्यात आलेयाबाबतची माहिती देण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले.यंत्रणा निर्माण करावीयावेळी परिवहन मंत्री परब यांनी, बिलाबाबतच्या तक्रारींचे शंभर टक्के निरसन करावे, कोणाही ग्राहकाला चुकीचे बिल भरायला लागू नये याची दक्षता वीज वितरण कंपन्यांनी घ्यावी; तक्रारींबाबत जलद प्रतिसाद पद्धतीने कार्यवाहीची यंत्रणा निर्माण करावी आदी सूचना केल्या.