नितीन इवलेकर यांच्यावर विरार येथे अंत्यसंस्कार
By admin | Published: July 20, 2014 02:33 AM2014-07-20T02:33:44+5:302014-07-20T02:33:44+5:30
मुंबई महानगरपालिकेचा अग्निशमन दलाचा जवान नितीन इवलेकर यांच्यावर त्यांच्या विरार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Next
वसई : अंधेरी येथे लोटस बिझनेस पार्कमध्ये शुक्रवारी लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अग्निशमन दलाचा जवान नितीन इवलेकर यांच्यावर त्यांच्या विरार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. इवलेकर हे विरार येथे राहत होते. आज त्यांचे पार्थिव विरार येथे आणण्यात आले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
खोटय़ा कॉलमुळे 15 मिनिटं फुकट
लोटस पार्क इमारतीमध्ये अनेक जण अडकल्याचे सांगण्यात येत होत़े मात्र अग्निशमन दलाने सर्व लिफ्ट्स तळमजल्यावर आणल्या़ परंतु दोन लिफ्ट वरच अडकल्या़ त्याच दरम्यान एक महिला 16 व्या मजल्यावर लिफ्टमध्ये अडकल्याचा कॉल आला़ त्यामुळे अग्निशमन दलाची एक तुकडी 16 व्या मजल्यावर पोहोचली़ मात्र लिफ्टमध्ये कोणी नसून तो कॉल खोटा असल्याचे लक्षात आल़े या कालावधीत 15 मिनिटं वाया गेली़ त्यामुळे या कॉलची चौकशी होणार असल्याचे उप प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांनी सांगितल़े
आगप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - महापौर
मुंबई : अंधेरी लिंक रोडवरील लोटस बिझनेस पार्क इमारतीच्या एकविसाव्या-बाविसाव्या मजल्यांना शुक्रवारी लागलेली आग विझवताना अग्निशमन दलातील एका जवानास प्राण गमवावे लागले होते. आगीचे कारण शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापौर सुनील प्रभू यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.
लोटस बिझनेस पार्क इमारतीच्या विविध बांधकाम परवानग्यांसह जे कोणी दोषी असतील त्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. ही इमारत बांधताना आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत का, यासह महापालिका प्रशासन व अन्य प्राधिकरण यांच्याकडून अत्यावश्यक परवानग्या, आग विझवण्याची साधने, फायर ऑडिटबाबतची कायर्वाही इमारतीच्या व्यावसायिकांनी पूर्ण केली होती का, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही प्रभू यांनी प्रशासनास दिले आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना मुंबईसारख्या शहरात होऊ नयेत यासाठी उंच इमारतीच्या बाबतीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पुनव्र्यवस्थापन करण्यासाठी सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देशही त्यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत. (प्रतिनिधी)